काँग्रेस सर्व निवडणुका तयारीनिशी लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST2021-09-23T04:36:46+5:302021-09-23T04:36:46+5:30

कळंब : तालुक्यातील सर्वच निवडणुकांत काँग्रेस पक्ष तयारीने उतरणार आहे. सर्वसामान्यांत पक्षाचे स्थान अजूनही कायम आहे. त्यांना सोबत घेऊन ...

Congress will fight all election preparations | काँग्रेस सर्व निवडणुका तयारीनिशी लढवणार

काँग्रेस सर्व निवडणुका तयारीनिशी लढवणार

कळंब : तालुक्यातील सर्वच निवडणुकांत काँग्रेस पक्ष तयारीने उतरणार आहे. सर्वसामान्यांत पक्षाचे स्थान अजूनही कायम आहे. त्यांना सोबत घेऊन सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी मंडळाच्या निवडणुकांत पक्षाला विजयी करण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी केले.

कळंब तालुका व शहर काँग्रेसच्या विविध विभागांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शहरातील मोहा रोडवरील पक्षाच्या संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत तालुका व शहर काँग्रेसच्या कार्याचा आढावा, विविध निवडणुका व नवीन नियुक्त्या याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, पक्ष निरीक्षक तथा जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कामगार सेलचे अध्यक्ष दयानंद एडके, जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव करंजकर, जिल्हा सदस्य उद्धव धस, तालुका उपाध्यक्ष ॲड. मनोज चोंदे, माजी तालुकाध्यक्ष दिलीपसिंह देशमुख, पोपट आंबीरकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष भय्या निरफळ, अशोक भातलवंडे, पं.स.चे माजी सभापती प्रभाकर जाधव, सुनील जाधव, अनिल माने, जिल्हा सचिव बाबूराव तवले, बाळासाहेब महाजन, सेवादल यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ॲड. प्रणीत डिकले, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शहाजन शिकलगार, ओबीसी अध्यक्ष हरिदास जाधव, अजित खलसे, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष रवी ओझा, सुरेश मस्के, अनंत घोगरे, विशाल शितोळे, सुदर्शन देशमुख, बालाजी पवार, अंकुश गायकवाड, रवी माने आदींची उपस्थिती होती.

चौकट -

महिला कार्यकारिणीची निवड

काँग्रेसच्या महिला विभागाच्या उपजिल्हाध्यक्ष ज्योती सपाटे यांच्या सूचनेनुसार तालुका महिला काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष अंजली ज्योतिबा ढवळे, कामगार सेल तालुकाध्यक्ष शीतल दादाराव खंडागळे, उपाध्यक्ष वैशाली भिकाजी धावारे, कीर्तीमाला सतीश लोमटे, सचिव शिवकन्या बबन फले, सहसचिव संगीता शहाजी पांचाळ, कोषाध्यक्ष विमल अंकुश खराटे, शहराध्यक्ष इंदू विश्वंभर तनपुरे, उपशहराध्यक्ष संध्या बाळू कदम, कोषाध्यक्ष सुरेखा शहाजी घुले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

Web Title: Congress will fight all election preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.