शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला ‘हात’ दाखवीत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत; उस्मानाबाद जिल्हा बँकेत महाआघाडीमध्ये फूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 18:37 IST

भाजपला बँकेत एंट्रीही मिळू शकली नाही. या विजयाने महाविकास आघाडीत मोठा उत्साह संचारला होता. मात्र, हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही.

उस्मानाबाद : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीचा मोठा ड्रामा पहायला मिळाला. एकत्र येऊन गुण्यागोविंदाने निवडणूक लढविल्यानंतर आता पदाधिकारी निवडीवेळी सेनेला हात दाखवीत काँग्रेस व राष्ट्रवादीने दोन्ही पदे आपल्या पदरी पाडून घेतली. यामुळे आघाडीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १५ जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील पाच जागा बिनविरोध निघाल्या होत्या, तर १० जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला. यामध्ये सर्वच दहाही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. परिणामी, भाजपला बँकेत एंट्रीही मिळू शकली नाही. या विजयाने महाविकास आघाडीत मोठा उत्साह संचारला होता. मात्र, हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही.७ मार्चला बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम लावण्यात आला. यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नामनिर्देशने स्वीकारण्यास सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे बापूराव पाटील यांनी चेअरमन, तर राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांनी व्हाईस चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केला. यापाठोपाठ सेनेचेही अर्ज दाखल झाले. सेनेकडून चेअरमन पदासाठी संजय देशमुख, तर व्हाईस चेअरमन पदासाठी बळवंत तांबारे यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी माघार घेण्याच्या वेळेपर्यंत प्रयत्न झाले. मात्र, कोणीही माघार न घेतल्याने शेवटी मतदान घ्यावे लागले. यामध्ये ११ मते घेऊन बापूराव पाटील व मधुकर मोटे विजयी झाले, तर सेनेचे उमेदवार संजय देशमुख व बळवंत तांबारे यांना प्रत्येकी ४ मते पडली.

आलबेल असताना पडली ठिणगी...महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अगदी निवडीच्या काही काळ आधीपर्यंत सर्व काही आलबेल होते. मात्र, काही तास आधी सेनेतील एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला आणि सेनेचे अर्ज भरले गेले. अगदी निवडीनंतरही बँकेचे नूतन अध्यक्ष बापूराव पाटील यांनी आघाडीतील ही बिघाडी नाही. काही निर्णय अचानक होतात. त्यातलाच हा प्रकार असल्याचे सांगून फुटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस