रुग्णकल्याण समितीची येणेगुरात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:23+5:302021-09-23T04:37:23+5:30
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे डेंग्यूसदृश आजाराने डाेके वर काढले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतील काॅंग्रेसचे ...

रुग्णकल्याण समितीची येणेगुरात बैठक
उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे डेंग्यूसदृश आजाराने डाेके वर काढले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतील काॅंग्रेसचे सदस्य तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष रफिक तांबाेळी यांनी बुधवारी आराेग्य केंद्रात तातडीने बैठक बाेलावली. यावेळी ॲबेटिंगसह अन्य उपाययाेजना तातडीने करण्याचे निर्देश आराेग्य यंत्रणेला त्यांनी दिले. बैठकीस पंचायत समिती सदस्य सुवर्णा भालेराव, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार साेनकटाळे, तुगावचे उपसरपंच भालचंद्र लाेखंडे, सुपतगावचे उपसरपंच रतन लामजाने, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सुहास साळुंके यांची प्रमुख उपस्थिती हाेती. बैठकीला सुरूवात हाेताच सदस्य तांबाेळी यांनी येणेगुरात डाेके वर काढलेल्या डेंग्यूसदृश आजाराचा मुद्दा उपस्थित केला. ही साथ पसरण्यामागे काेणकाेणती कारणे आहेत, याबाबत माहिती घेतली. चाैफेर चर्चा झाल्यानंतर त्यांनी तातडीने गावात ॲबेटिंग करून घेण्याचे निर्देश दिले. साेबतच आशा कार्यकर्त्यांनी डाेअर टू डाेअर जाऊन काेरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन करावे, अशी सूचना केली. ग्रामस्थांनीही थाेडीबहुत लक्षणे दिसली तरी तातडीने आराेग्य केंद्रात जाऊन डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी डाॅ. ज्ञानेश्वर सावळकर, महमद पठाण, सुधाकर जाधव, विशाल उन्हाळे, नर्स स्वामी आदींची उपस्थिती हाेती.