कळंब येथे दंगा काबूची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST2021-09-18T04:35:52+5:302021-09-18T04:35:52+5:30
कळंब - श्री गणेश उत्सव सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावा याकरिता कळंब पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी सराफा लाईन भागात ...

कळंब येथे दंगा काबूची रंगीत तालीम
कळंब - श्री गणेश उत्सव सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावा याकरिता कळंब पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी सराफा लाईन भागात ''दंगा काबू'' योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
गणेशोत्सवाच्या आगामी काळात शांतता प्रस्थापित राहावी, कायद्याचे पालन व्हावे याकरीता पोलीस निरीक्षक यशवंत जाधव काळजी घेत आहेत. यानुसार कळंब पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील सोनार लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आण्णाभाऊ साठे चौक,सावरकर चौक, होळकर चौक, बागवान चौक,कथले चौक, गांधीनगर,बसस्थानक इत्यादी ठिकाणाहून रूटमार्चही काढला. या रूटमार्च दरम्यान लोकांमध्ये जनजागृती करून लोकांना कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत विसर्जन करण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले. रूट मार्च व दंगा काबू योजनेकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. डी. पवार, ए. वाय. पाटील, के. बी. दराडे तसेच ३५ पोलीस अंमलदार व २६ होमगार्ड हजर होते.
चौकट...
ठाण्यातंर्गत २६ मंडळे...
कळंब पोलीस ठाणे अंतर्गत शहरी व ग्रामीण भागामध्ये २६ गणेश मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. कळंब पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे.