पिकांची नुकसानीची माहिती संकलित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:32+5:302021-08-18T04:38:32+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर, सोलापूर जिल्ह्यांत मुबलक पावसामुळे खरीप पिकाची पेरणी होऊन पिके जोमदार आली; परंतु मान्सूनच्या पावसाने अचानक ...

पिकांची नुकसानीची माहिती संकलित करा
उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर, सोलापूर जिल्ह्यांत मुबलक पावसामुळे खरीप पिकाची पेरणी होऊन पिके जोमदार आली; परंतु मान्सूनच्या पावसाने अचानक उघाड दिल्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग, आदी पिके आता सुकत आहेत. त्यामुळे या नुकसानीची माहिती घेण्याची तात्काळ अधिसूचना काढण्याची मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून पीकविमा भरला असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार उत्पादनामध्ये सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर नुकसानभरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्क्यांपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.
त्यामुळे महसूल व कृषी विभागामार्फत पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील झालेल्या पिकांची नुकसानीची माहिती घेऊन आपल्यामार्फत नियुक्त संबंधित विमा कंपनीस कळविण्यात यावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.