शाखा अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यास ठेवले डांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:46+5:302021-01-04T04:26:46+5:30
उस्मानाबाद : शहरातील चव्हाण माेटर्सच्या शाखा व्यवस्थापकासह सहकाऱ्यास एकाने हाॅटेलमध्ये डांबून ठेवल्याची घटना २ जानेवारी राेजी घडली. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध ...

शाखा अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यास ठेवले डांबून
उस्मानाबाद : शहरातील चव्हाण माेटर्सच्या शाखा व्यवस्थापकासह सहकाऱ्यास एकाने हाॅटेलमध्ये डांबून ठेवल्याची घटना २ जानेवारी राेजी घडली. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध बेंबळी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील चव्हाण माेटर्समध्ये अक्षय गुंडद हे शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यांच्या शाेरूमधून बेंबळी येथील राम साेनटक्के यांनी एक वाहन खरेदी केले हाेते. या वाहनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी अक्षय गुंदड व त्यांचे सहकारी सिद्धेश्वर वाघमारे ठरल्यानुसार बेंबळी येथील एका हाॅटेलमध्ये थांबले हाेते. यावेळी तेथे असलेले राम साेनटक्के यांनी ‘तुम्ही मला नवीन वाहन द्या किंवा माझे पैसे परत द्या’ असे म्हणत हुज्जत घातली. यानंतर गुंडद व वाघमारे यांना हाॅटेलमध्ये डांबून ठेवले असता उशिराने त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर शाखा व्यवस्थापक गुंदड यांनी बेंबळी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून संबंधिताविरुद्ध भा.दं.सं.चे कलम ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास बेंबळी पाेलीस करीत आहेत.