शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचा जबरा फॅन; दोन वर्ष ‘त्यानं’ दाढी अन् केस कापलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 10:42 IST

गावात चेष्टेचा विषय ठरुनही दोन वर्ष केसांना कात्री लावली नाही

कळंब (जि. उस्मानाबाद) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दोन वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. या काळात वाढत्या वयामुळे थकलेले, दाढी वाढलेले भुजबळ अनेकदा पाहायला मिळाले. मात्र भुजबळ तुरुंगात आहेत म्हणून उस्मानाबादच्या कळंबमधील त्यांच्या एका चाहत्यानंही तब्बल दोन वर्ष दाढी आणि केस कापले नाहीत. आपले नेते आपल्याला ओळखत असोत वा नसोत, तरीही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी नसते. नेत्यांवर प्रेम करणारे असे अनेक चाहते पाहायला मिळतात. कळंब तालुक्यातील मोहा येथे राहणाऱ्या बिभीषण माळी हे त्यापैकीच एक. भुजबळ तुरुंगात जाताच त्यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या बिभीषण माळी यांनी संकल्प केला. 'साहेब जोपर्यंत तुरुंगातून बाहेर येत नाहीत, तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही', असा निश्चय त्यांनी केला आणि तो पूर्णत्वासही नेला. मोहा येथे वास्तव्यात असणारे 35 वर्षांचे बिभीषण राजाराम माळी उदरनिर्वाहासाठी गावातच पान टपरीचा व्यवसाय करतात. यावर कुटुंबाचा आर्थिक गाडा हाकणं अवघड असल्यानं ते गावातील एका संस्थेची दैनंदिन ठेव संकलित करतात. कौटुंबिक स्थिती अशी साधारण असलेल्या मोहा येथील बिभीषण माळी यांचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर कमालीचा जीव. आयुष्यात सबकुछ 'भुजबळ' असलेल्या या कार्यकर्त्याचे नेत्यावरील प्रेम गावातील सर्वांना माहित आहे. गावात जरी बिभीषण यांच्या भुजबळ प्रेमाची चर्चा असली, तरी भुजबळांना यांना याबद्दल कोणतीही कल्पना नाही. मात्र तरीही भुजबळ तुरुंगात जाताच त्यांनी दाढी आणि केस न कापण्याचा संकल्प केला.  महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात भुजबळांना दोन वर्षांपूर्वी अटक झाली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मात्र इतकं सारी होऊनही भुजबळांवर  निस्सिम प्रेम करणाऱ्या बिभीषण यांची श्रद्धा जराही ढळली नाही. 'साहेब जामिनावर बाहेर आल्याशिवाय केसाला कात्री लावणार नाही' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. गेल्या २६ महिन्यांपासून बिभीषण यांनी दाढी केलेली नाही. तसेच केसही कापलेले नाहीत. यामुळे एखाद्या 'बुवा'सारखे दिसू लागलेले बिभीषण गावात चेष्टेचा ठरले. मात्र तरीही त्यांनी माघार घेतली नाही.  आता भुजबळांना भेटणारशुक्रवारी छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. ही बातमी समजताच बिभीषण यांना मोठा आनंद झाला. आता ते छगण भुजबळ यांची पुढील काळात प्रत्यक्षात भेट घेणार आहेत. ही भेट झाल्यानंतरच आपण केस कापणार असल्याचं बिभीषण यांनी सांगितलं.  

 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस