चव्हाण यांनी घेतला लसीकरणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:10+5:302021-04-17T04:32:10+5:30

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत १ हजार ५१ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. ...

Chavan reviews vaccinations | चव्हाण यांनी घेतला लसीकरणाचा आढावा

चव्हाण यांनी घेतला लसीकरणाचा आढावा

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत १ हजार ५१ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व सरपंच अशोकराव पाटील यांनी नुकतीच येथे भेट देऊन आढावा घेतला. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हंगरगा, नंदगाव व सलगरा उपकेंद्र येतात. प्रकाश चव्हाण यांनी लसीकरणासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून जळकोट आरोग्य केंद्रातील लसीकरणासंदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर जनतेला लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपसरपंचपती बसवराज कवठे, बसवराज भोगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश येडगे, औषध निर्माता सी. एस. होनाळे, एस. एम. कुलकर्णी, एम. एफ. पठाण, डी. बी. लोखंडे, आरोग्य सेवक अण्णासाहेब कोळगे, एलएचव्ही कांबळे, मधुकर वाघमारे, प्रवीण कदम आदीसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Chavan reviews vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.