यंदाही गुणवत्तेवर शुल्क सवलत योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:39+5:302020-12-26T04:25:39+5:30
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रथम ...

यंदाही गुणवत्तेवर शुल्क सवलत योजना
तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी गुणवत्तेवर आधारित शुल्क सवलत योजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्राचार्य डॉ. जगदे म्हणाले की, मंदिर संस्थानने गेल्या दोन वर्षांपासून श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशार्थींना शुल्क सवलत योजना गुणवत्तेवर लागू केली आहे. गेल्या दोन वर्षांत एकूण २२८ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, तसेच मागील दोन वर्षांमध्ये मुलींना एक वर्षाकरता मोफत वसतिगृह सुविधादेखील देण्यात आली असून, यंदाही ही योजना सुरू आहे. मागील शैक्षणिक वर्षात मुंबई, पुणे या ठिकाणच्या नामांकित कंपनीत ७० टक्के विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे, तसेच चालू शैक्षणिक वर्षात १०० टक्के प्लेसमेंट करण्याचा निर्धार महाविद्यालयाने केल्याचे त्यांनी सांगितले.
मंदिर संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांचा मार्गदर्शनाखाली समाजातील गोरगरीब, शेतकरी व होतकरू विद्यार्थ्यांना अभियंते होण्यासाठी गुणवत्तेवर आधारित शुल्क सवलतीची योजना राबवली जाते. याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही प्राचार्य डॉ. शेखर जगदे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. रवी मुदकन्ना, विभागप्रमुख प्रा. प्रदीप हंगरगेकर आदी उपस्थित होते. (वाणिज्य वार्ता)