दहिफळ ग्रामपंचायतीला सीईओंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:35+5:302021-04-15T04:30:35+5:30

मोहा : कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी भेट दिली. या ...

CEO visits Dahiphal Gram Panchayat | दहिफळ ग्रामपंचायतीला सीईओंची भेट

दहिफळ ग्रामपंचायतीला सीईओंची भेट

मोहा : कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी भेट दिली. या वेळी गावातील विकासकामांचा आढावा घेतला. तसेच ‘माझे गाव, सुंदर गाव’ मोहिमेची माहिती घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून घेण्याची सूचना केली. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वयोवृद्ध नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. कुणाला कसलाही आजार झाल्यास तातडीने डॉक्टरांकडून औषधी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी सरपंच चरणेश्वर पाटील यांनी सीईओ डॉ. फड यांचा सत्कार केला. या वेळी ग्रामविकास अधिकारी हनुमंत झांबरे, बीडीओ नामदेव राजगुरू, सदस्य प्रदीप भातलवंडे, बापू भातलवंडे, शिपाई संतोष उपळकर, गणेश भातलवंडे, वसंत धोंगडे, पांडुरंग मते आदी उपस्थित होते.

Web Title: CEO visits Dahiphal Gram Panchayat