उमरग्यात संतसेना महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST2021-09-06T04:37:02+5:302021-09-06T04:37:02+5:30

उमरगा : श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी शहरातील दर्गा गल्ली येथील संत सेना महाराज मंदिरात छोटेखानी कार्यक्रम ...

Celebrating Sant Sena Maharaj Jayanti in Umarga | उमरग्यात संतसेना महाराज जयंती साजरी

उमरग्यात संतसेना महाराज जयंती साजरी

उमरगा : श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी शहरातील दर्गा गल्ली येथील संत सेना महाराज मंदिरात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले.

प्रारंभी प्रा. डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. यानंतर भजन सोहळा झाला. शनिवारी सकाळी दहा वाजता ह. भ. प. भीम सुरवसे यांचे प्रवचन झाले. दुपारी १२ वाजता श्रींची मूर्ती व प्रतिमेवर गुलाल व पुष्पवृष्टी अर्पण करण्यात आली. यावेळी ह. भ. प. वीरनाथ काळे महाराज, गुरुनाथ विभूते, नागेश सोमवंशी, विठ्ठल जवळगेकर, केशवराव काळे, चंद्रकांत काळे, दुधाराम क्षीरसागर, अविनाश काळे, जगदीश सुरवसे, प्रा. जी. जी. काळे, प्रा. बी. ए. ढगे, काका सूर्यवंशी, प्रदीप चौधरी, सतीश काळे, शाम काळे, बालाजी काळे, संतोष काळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, भास्कर मुळे, गणेश काळे, पिंटू मुलगे, प्रताप मुळे, आकाश काळे, सोमनाथ काळे, गणेश काळे, प्रल्हाद कारागीर, शिवाजी मुळे, मुरलीधर काळे, नीलेश काळे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Celebrating Sant Sena Maharaj Jayanti in Umarga