यशवंतराजे थोरात यांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:15+5:302021-01-13T05:25:15+5:30
भूम : येथील यशवंतराजे थोरात यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट ...

यशवंतराजे थोरात यांचा वाढदिवस साजरा
भूम : येथील यशवंतराजे थोरात यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट भूम शहर कमिटीच्या वतीने आयोजित शिबिरात शहरातील १०५ दात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे, शुभम निंबाळकर, हृतिक वीर, विशाल वीर, राकेश सुरवसे व अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी परिश्रम घेतले. शहरातील प्रत्येक प्रभागात युवक कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. सायंकाळी शहरातील संत तुकाराम चौक येथे सार्वजनिक अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाशीचे नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, परंड्याचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अमेय पाटील, बाजार समितीचे सभापती रमेश मस्कर, माजी नगराध्यक्ष अनिल वीर, भाजपचे बाळासाहेब क्षीरसागर, अण्णासाहेब देशमुख, आर. डी. सूळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, शेखराहीम शेख, रामदास जाधव, नगरसेवक रोहन जाधव, राजेंद्र लोंढे, माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष रूपेश शेंडगे, उमेश माळी, विहंग कदम, गणेश वीर, रणजित वीर, ॲड. प्रकाश आकरे, संभाजी गरड, सुनील वीर, राजेंद्र पवार, भाऊसाहेब लोंढे, विलास मुळूक, जावेद शेख, अल्ताब शेख, राज वीर, वाजीद मोमीन, अजित मुळीक यांच्यासह युवक उपस्थित होते. सूत्रसंचालन अलीम शेख यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष अनिल वीर यांनी मानले.
(कॅप्शन)
भूम येथे यशवंतराजे थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना गणेश वीर, रणजित वीर, प्रकाश आकरे, जावेद शेख, अल्ताब शेख, भाऊसाहेब लोंढे आदी.