येडशीच्या उड्डाण पुलावरून कार कोसळली, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:06 IST2019-07-18T00:05:58+5:302019-07-18T00:06:07+5:30
उस्मानाबाद तालुक्यातील येडशीनजीक असलेल्या उड्डाण पुलावरून भरधाव कार कोसळली.

येडशीच्या उड्डाण पुलावरून कार कोसळली, एक गंभीर जखमी
येडशी (जि. उस्मानाबाद) : उस्मानाबाद तालुक्यातील येडशीनजीक असलेल्या उड्डाण पुलावरून भरधाव कार कोसळली. बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडलेल्या या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, औरंगाबाद-सोलापूर महामार्गाने भरधाव कार (क्र. एमएच. २५/आर. २३३०) उस्मानाबादच्या दिशेने येत होती. ही कार बुधवारी रात्री १०.३० वाजता येडशीनजीक असलेल्या उड्डाण पुलावर आली असता चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे सदरील कार उड्डाण पुलावरून खाली कोसळली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी उस्मानाबाद येथील दवाखान्यात दाखल केले आहे. कारमध्ये केवळ एकच व्यक्ती होती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे जखमीचे नाव समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळी एक आधारकार्ड मिळाले आहे. त्यावर निखिल सुधाकर वाघमारे असे नाव आहे. मात्र हे कार्ड 'त्या' जखमीचे आहे की नाही, याची खात्री होऊ शकली नाही.