जहागीरदारवाडी येथे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST2021-09-24T04:39:10+5:302021-09-24T04:39:10+5:30

बियाणासाठी साेयाबीन राखून ठेवा उस्मानाबाद : सध्या खरीप हंगामातील साेयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. काही शेतकरी नवीन साेयाबीन बाजारात ...

Camp at Jahagirdarwadi | जहागीरदारवाडी येथे शिबिर

जहागीरदारवाडी येथे शिबिर

बियाणासाठी साेयाबीन राखून ठेवा

उस्मानाबाद : सध्या खरीप हंगामातील साेयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. काही शेतकरी नवीन साेयाबीन बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत. यंदा साेयाबीनला चांगला दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. शेतकऱ्यांनी दराबाबत कुठल्याही स्वरूपाच्या अफवेला बळी न पडता बाजारपेठेतील दराचा अभ्यास करून साेयाबीन विक्री करावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कळंब येथे गाेरे हिचा सत्कार

उस्मानाबाद : कळंब शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनी श्रेया तानाजी गाेरे हिने सादर केलेल्या प्रयाेगाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. याबद्दल तिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी पालक तानाजी, विज्ञान शिक्षक शंकर गाेंदकर, प्राचार्य जे. डी. कुपकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख काकासाहेब मुंडे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर ताेडकर यांनी मानले.

Web Title: Camp at Jahagirdarwadi