दहिफळ येथे घरफाेडी, दागिने, पैसे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST2021-08-12T04:36:18+5:302021-08-12T04:36:18+5:30

उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील दहिफळ येथील दुसऱ्या मजल्यावरील घर फाेडून अज्ञाताने सुमारे १८५ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, माेबाईल व ...

Burglary, jewelery, money lamps at Dahiphal | दहिफळ येथे घरफाेडी, दागिने, पैसे लंपास

दहिफळ येथे घरफाेडी, दागिने, पैसे लंपास

उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील दहिफळ येथील दुसऱ्या मजल्यावरील घर फाेडून अज्ञाताने सुमारे १८५ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, माेबाईल व राेख ७५ हजार रुपये लंपास केले. ही घटना ८ ऑगस्टच्या रात्री घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सोमवारी (दि. ९) येरमाळा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दहिफळ येथील गंगाधर बापूराव ढवळे यांचे दुसऱ्या मजल्यावर घर आहे. अज्ञात चाेरट्यांनी दुसऱ्या मजल्यावर दाखल हाेत खाेलीचा कडी, काेयंडा ताेडला. यानंतर आत प्रवेश करून १८५ ग्रॅम वजनाचे साेने, चांदीचे दागिने, माेबाईल तसेच राेख ७५ हजार रुपये लंपास केले. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर ढवळे यांनी येरमाळा ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Burglary, jewelery, money lamps at Dahiphal