जोरदार पावसाने निर्माणाधीन पूल, पर्यायी रस्ता पाण्याखाली; कळंब-ढाेकी दरम्यान वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 01:24 PM2021-09-24T13:24:11+5:302021-09-24T13:27:39+5:30

rain in osmanabad : भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या लगत उभारण्यात आलेल्या पर्यायी रस्ता पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले.

Bridge under construction due to heavy rains, alternative road under water; Traffic jam during Kalamb-Dhaki | जोरदार पावसाने निर्माणाधीन पूल, पर्यायी रस्ता पाण्याखाली; कळंब-ढाेकी दरम्यान वाहतूक ठप्प

जोरदार पावसाने निर्माणाधीन पूल, पर्यायी रस्ता पाण्याखाली; कळंब-ढाेकी दरम्यान वाहतूक ठप्प

googlenewsNext

उस्कमानाबाद/कळंब : गुरुवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेला पाऊस पुढे रात्रभर टिकला. यामुळे भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या पर्यायी रस्तावरून पाणी वाहत असल्याने राज्यमार्गावरील कळंब-ढोकी येथे वाहतूक ठप्प झाली होती.

कळंब शहरासह ग्रामीण भागात गुरूवारी दुपारपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यात रात्री नऊच्या सुमारास पावसाचा जोर वाढला, तो पुढे पहाटेपर्यंत टिकला. यामुळेच कळंब पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या लगत उभारण्यात आलेल्या पर्यायी रस्ता पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. यामुळे कळंब ढोकी राज्यमार्गावरील वाहतूक मध्यरात्रीनंतर बंद झाली आहे. या पर्यायी पुलाचा काही भाग वाहून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

बांधकाम विभागाला जाग कधी येणार
कळंब ढोकी या राज्यमार्गाची बांधकाम विभागाच्या हायब्रिड अॅन्युइटी अंतर्गत सुधारणा करण्यात येत आहे. यातील भाटशिरपुरा येथील काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. असे असतानाही संबंधित कंत्राटदार, बांधकाम विभागाच्या मिलिभगतीमुळे नागरिकांच्या रेट्याला कोणी दाद देत नाही. याचाच फटका आजच्या पावसात दिसुन येत आहे.

सातेफळ, डिकसळ येथे म्हैसी ठार
तालुक्यातील सातेफळ व डिकसळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन म्हैशी गुरुवारच्या पावसात विज पडून मयत झाल्या आहेत.

Web Title: Bridge under construction due to heavy rains, alternative road under water; Traffic jam during Kalamb-Dhaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.