स्तनदा मातांचा काक्रंब्यात मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:59+5:302021-09-27T04:35:59+5:30

अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या कुसुम बंडगर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वर्षा बंडगर, कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षा मोरवाळकर उपस्थित ...

Breastfeeding mothers should meet in Kakramba | स्तनदा मातांचा काक्रंब्यात मेळावा

स्तनदा मातांचा काक्रंब्यात मेळावा

अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या कुसुम बंडगर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वर्षा बंडगर, कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षा मोरवाळकर उपस्थित होत्या. मेळाव्यात शून्य ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या माता व किशोरी बालिका आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी वेगवेगळ्या डाळी, पालेभाज्या एकत्र करून तयार केलेल्या पदार्थांची प्रदर्शनाद्वारे माहिती देण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राच्या वर्षा मोरवाळकर व सुपरवायझर रोहिणी कुलकर्णी यांनी रोजच्या आहारामध्ये कडधान्य पालेभाज्यांचा नियमित वापर केल्यास गरोदर महिला व लहान बालकांचे शरीर सुदृढ राहून निरोगी राहते, असे सांगितले.

पाककृती स्पर्धेत विजेत्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी अंगणवाडी कार्यकर्ती सुरेखा देवगुंडे, कांचनगंगा मोरे, निशाली बंडगर, मंगल क्षीरसागर, वच्छला भिसे, ललिता हांडे, मीरा ढेरे, मीरा थोरात, अलका दळवे, कौशल्या गाडेकर, सरस्वती सुरवसे, उमेदच्या भाग्यश्री म्हेत्रे, शीला क्षीरसागर, छाया स्वामी, पुष्पा बचाटे, वनिता गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.

250921\5011img-20210924-wa0100.jpg

काक्रंबा येथे राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रमाचे आयोजन

Web Title: Breastfeeding mothers should meet in Kakramba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.