काक्रंबावाडीत तरुणाने उभारले ‘पुस्तकांचे घर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST2021-09-23T04:36:44+5:302021-09-23T04:36:44+5:30

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाविना समाजमाध्यमांवर आपला वेळ वाया घालवत आहेत. त्यामुळे ...

'Book house' set up by youth in Kakrambawadi | काक्रंबावाडीत तरुणाने उभारले ‘पुस्तकांचे घर’

काक्रंबावाडीत तरुणाने उभारले ‘पुस्तकांचे घर’

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाविना समाजमाध्यमांवर आपला वेळ वाया घालवत आहेत. त्यामुळे काक्रंबा (वाडी) येथील महेश कोळेकर यांनी गावात वाचनालय नसल्याने आपल्या घरीच स्वखर्चाने काही ग्रंथ, विविध साहित्यिकांची, संशोधकांची पुस्तके खरेदी करून गावातील तरुण व लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘पुस्तकांचे घर’ उभारले आहे. या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. शिरीष आहेरकर यांनी या उपक्रमाची दखल घेत जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयांची विविध क्षेत्रातील पुस्तके काक्रंबा (वाडी) येथे पोहोच केली. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दानशूर मंडळीही मदत करत आहेत. त्यामुळे काक्रंबा (वाडी) येथे या उपक्रमामुळे वाचन संस्कृती वाढीला लागली असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

210921\2545img-20210915-wa0135.jpg

महेश कोळेकर यांच्या घरातील राबवलेल्या पुस्तका चे घर

Web Title: 'Book house' set up by youth in Kakrambawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.