पालिकेने केले साडेतीन हजारांवर गणेश मूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST2021-09-21T04:35:57+5:302021-09-21T04:35:57+5:30
कळंब पालिकेच्या श्री गणेश विसर्जनाचा पॅटर्न यंदाही मोठा यशस्वी ठरला. शहरातील ११ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह जवळपास साडेतीन हजार ...

पालिकेने केले साडेतीन हजारांवर गणेश मूर्तींचे विसर्जन
कळंब पालिकेच्या श्री गणेश विसर्जनाचा पॅटर्न यंदाही मोठा यशस्वी ठरला. शहरातील ११ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह जवळपास साडेतीन हजार घरगुती श्रींच्या मूर्तींचे जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या हौदात पालिकेच्या वतीने विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले. सकाळी आठ वाजल्यापासून पाच प्रभागातील गणेश मूर्तींचे संकलन न. प. च्या आठ वाहनांद्वारे करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळाच्या आठ पदाधिकाऱ्यांना विसर्जन स्थळी परवानगी देण्यात आली होती. त्यांनीही कोरोना निर्बंधांचे पालन करीत साधेपणाने विसर्जन प्रक्रिया पार पाडली. काही मंडळींनी मांजरा नदीच्या पात्रात श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करून गणरायाला निरोप दिला. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुका, ढोल ताशे, बँडबाजा आदींवर निर्बंध असल्याने मिरवणूक मार्गावर मात्र शांतता होती. पुढील वर्षी तरी ही परिस्थिती बदलू दे असे साकडेही गणेश भक्तांनी यावेळी गणरायाला निरोप देताना घातले.
दरम्यान, कळंब येथे गणेश विसर्जन प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, पालिकेचे कर्मचारी दीपक हारकर, संजय हाजगुडे, महेश मुंडे, पिंकू गायकवाड, प्रवीण हौसलमल आदींनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.