५९ जणांचे रक्तदान, निराधारांना भरपेहराव वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:43 IST2021-01-08T05:43:59+5:302021-01-08T05:43:59+5:30
उस्मानाबाद : भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा रूपामाता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांचा वाढदिवस पाडोळी (आ) येथे ...

५९ जणांचे रक्तदान, निराधारांना भरपेहराव वाटप
उस्मानाबाद : भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा रूपामाता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांचा वाढदिवस पाडोळी (आ) येथे ५९ तरुणांनी रक्तदान करून तसेच पाडोळी (आ) परिसरातील ८१ निराधार व्यक्तींना मायेचा आधार म्हणून कपडे वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी रूपामात नॅचरल शुगर पाडोळी (आ) येथे कारखान्याचे व्हाईस चेअरमन एम. के. सूर्यवंशी, जि.प. चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, व्यवस्थापकीय संचालक ॲड. अजितकुमार गुंड, कार्यकारी संचालक गरड, चिफ इंजिनीअर खोचरे, चिफ केमिस्ट निरफळ, सुरक्षा अधिकारी मसे तसेच कारखान्यातील कर्मचारी व रूपामाता डेअरीचे जनरल मॅनेजर माने, सावळकर, रूपामाता डेअरीचे सर्व कर्मचारी व पाडोळी (आ) ग्रामस्थांच्या वतीने औड. गुंड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंबिका स्टोन क्रशरचे संदीप एकंडे, कन्हैया पेट्रोलपंपाचे तावडे तसेच पाडोळीकर दुध डेअरीचे प्रदीप गुंड यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद येथील रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये उद्योजक संजय पटवारी यांनी ॲड. गुंड यांचा सत्कार केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरथ जोशी, सरव्यवस्थापक बोधले, उप-सरव्यवस्थापक मिलीद खांडेकर, घेवारे, तसेच व्यवस्थापक खोत व कर्मचारी उपस्थित होते. पाडोळी (आ) येथे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुख्याध्यापक सूर्यवंशी, अमोल गुंड, इर्लेकर, सूर्यवंशी तसेच लासोना येथील रूपामाता विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक मनसुळे, शेख, यादव, गाबीत यांनी ॲड. गुंड यांचा सत्कार केला.
उस्मानाबाद येथील समर्थ हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात ॲड. पांडुरंग महाराज लोमटे, पत्रकार राजाभाऊ वैद्य, शिवसेनेचे दादा कोळगे, शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने, रणसुभे, पाडोळी (आ) सोसायटीचे चेअरमन भरत गुंड, पोलिस पाटील धनंजय गुंड, नानासाहेब अंबुरे, मनोज गुंड, ॲड. शरद गुंड, आयडीबीआय, इक्वीटास बॅकेचे व्यवस्थापक आदींची यावेळी उपस्थिती होती.