अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको
By सूरज पाचपिंडे | Updated: February 27, 2023 18:18 IST2023-02-27T18:18:14+5:302023-02-27T18:18:31+5:30
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महारामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अतिक्रमण हटविण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीचा रास्ता रोको
धाराशिव : शहरातील राजर्षी शाहू महाराज चौक ते किंग्ज हॉटेल दरम्यानचे अतिक्रमण हटविण्यात यावे, या इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सोमवारी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महारामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील राजर्षी शाहू महाराज चौक ते किंग्ज हॉटेल दरम्यान अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. अतिक्रम हटविण्यासंदर्भात वारंवार प्रशासनाकडे मागणी केली जात आहे. मात्र, त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या परिसरात पदपथाची निर्मिती केली नसल्याचा आरोपही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा अनुराधा लाेखंडे, शीतल चव्हाण, मंगल आवाड, लक्ष्मी गायकवाड आदी सहभागी झाल्या होत्या.