शेतकरी संघटनेचा अणदुरात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST2020-12-26T04:25:36+5:302020-12-26T04:25:36+5:30

शेतीसाठी रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा बंद करून तो दिवसा करावा, पीकविमा व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, कर्जासाठी ...

Block the path of the farmers' association | शेतकरी संघटनेचा अणदुरात रास्ता रोको

शेतकरी संघटनेचा अणदुरात रास्ता रोको

शेतीसाठी रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा बंद करून तो दिवसा करावा, पीकविमा व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, कर्जासाठी बँकेकडून होणारी हेळसांड थांबवावी, आदी मागण्यांचे निवेदन तलाठी विलास कोल्हे यांना यावेळी देण्यात आले. यावेळी बळीराजा पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मुजीब मकानदार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे, आम आदमी पार्टीचे शिवराज स्वामी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद घोडके, निखिल घोडके, आर. एस. गायकवाड, राजकुमार स्वामी, शिवाजी कांबळे यांची भाषणे झाली. आंदोलनासाठी निखिल घोडके, शिवकुमार स्वामी, विजय सावंत, संजय घुगे, बालाजी रजपूत, महेश करपे, सय्यद इनामदार, तात्या रोडे, यांच्यासह अणदूर, खुदावाडी, चिवरी, इटकळ, फुलवाडी येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Block the path of the farmers' association