भूममध्ये भाजपचा सेवा समर्पण मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST2021-09-25T04:35:47+5:302021-09-25T04:35:47+5:30
भूम : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, या अनुषंगाने येथे भाजपच्या वतीने सेवा समर्पण मेळावा घेण्यात आला. ...

भूममध्ये भाजपचा सेवा समर्पण मेळावा
भूम : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, या अनुषंगाने येथे भाजपच्या वतीने सेवा समर्पण मेळावा घेण्यात आला. यानंतर झालेल्या बैठकीत पक्षाच्या भूम शहराध्यक्षपदी शंकर खामकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या
सेवा समर्पण मेळाव्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. तसेच पक्षाचे प्रदेश महामंत्री आ. सुजीतसिंह ठाकूर व आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीपत्र दिले. यामध्ये भूम शहराध्यक्षपदी शंकर खामकर, उद्योग आघाडी तालुकाध्यक्षपदी रमेश बगाडे, अनुसूचित जाती-जमाती आघाडी भूम शहराध्यक्ष प्रदीप साठे, शहर उपाध्यक्ष अमोल लोंढे, तालुका चिटणीस बाबासाहेब वीर, शहर सरचिटणीस हेमंत देशमुख यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस आदम शेख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, परंडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, प्रवीण पाठक, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, पंचायत समिती माजी उपसभापती काकासाहेब चव्हाण, माजी सदस्य मधुकर अर्जुन, गणेश देशमुख, जहीर चौधरी, महिला तालुका अध्यक्षा लताताई गोरे, युवा जिल्हा सरचिटणीस ॲड. कुलदीपसिंह भोसले, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सरचिटणीस उत्कर्ष देशमुख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष महेबूब शेख, रमेश बगाडे, सचिन बारगजे, अमोल लोंढे, हेमंत देशमुख, जयसिंग पवार आदी उपस्थित होते.