येडशीच्या उपसरपंचपदी भाजपचे राहुल पताळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:39 IST2021-09-17T04:39:35+5:302021-09-17T04:39:35+5:30
उपसरपंच सुधीर सस्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी बैठक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी ...

येडशीच्या उपसरपंचपदी भाजपचे राहुल पताळे
उपसरपंच सुधीर सस्ते यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी बैठक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एन. डी. नागटिळक यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी बालाजी गरड व ग्रामविकास अधिकारी संजय आडे यांनी सहकार्य केले. बैठकीस संरपच गोपाळ नागटिळक, ग्रां. प. सदस्य सुधीर सस्ते, सुनीता होवाळ, यशोभिमा शिदे, अमोल ठाकर, जोती करंडे, शिवलिंग नकाते, विद्या पवार, संध्या कोरे, मंदाकिनी देशमुख, शिवगंगा गव्हार, गजानन नलावडे, चंदन नलावडे, यांच्यासह पं. स. सदस्य संजय लोखंडे, माजी उपसरपंच संजय करंडे, माजी प. स. उपसभापती अकबर तांबोळी, कुमेश पवार, सदाशिव तोडकरी, संतोष सस्ते, उल्हास कंकाळ, बालाजी देशमुख, भीमराव शिंदे, शैलेश पताळे, किरण तोडकरी, रामलिग पताळे, ज्ञानदेव गडकर, अनिल नलावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर आ. राणाजगजितसिंह पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी उपसरपंच पताळे यांचा सत्कार केला.
160921\img-20210916-wa0300.jpg
येडशीच्या उपसरपंचपदी भाजपचे राहुल पताळे