परीक्षा रद्द निर्णयाविरोधात भाजपा युवा मोर्चाचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST2021-09-26T04:35:35+5:302021-09-26T04:35:35+5:30
उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात ...

परीक्षा रद्द निर्णयाविरोधात भाजपा युवा मोर्चाचे निदर्शने
उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय जनता युवा माेर्चाच्या वतीने शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच परीक्षेची तारीख निश्चित करण्याची मागणी केली.
शासनाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शनिवारी भारतीय युवा माेर्चाच्या वतीने शासनाच्या या निर्णयाविरोधात निदर्शेने करुन गलथान कारभाराला जबाबदार असणारे आरोग्य मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केली. तसेच नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. राज्य सरकारने पुढील दोन दिवसात परीक्षेची पुढील तारीख जाहीर करावी, महाराष्ट्रातील नामांकीत एम.के.सी.एल. व एम.पी.एस.सी.च्या माध्यमातुन या परिक्षा घेण्यात याव्या. पुढील तीन दिवसात परीक्षेची तारीख निश्चित करून प्रसिद्ध करण्यात यावी, अशा मागण्या लावून धरल्या होत्या. यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, दुर्गाप्पा पवार, पांडुरंग पवार, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक सचिन लोंढे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, अमित कदम, प्रीतम मुंडे, भाजपा विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, सुरज शेरकर, सुजित साळुंके, अजित खापरे, गिरीश पानसरे, गणेश एडके, विकास पवार, मनोज सिंह ठाकूर, प्रसाद मुंडे यांच्यासह अनेक परिक्षार्थी व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.