भाजपच्या बैठकीत बुथ कमिटी, मंदिर उघडण्याबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST2021-08-12T04:36:35+5:302021-08-12T04:36:35+5:30

यावेळी सुहास सोळुंके, नागेश नाईक, नारायण ननवरे, जिल्हा मीडिया सेलचे संजय खुरुद आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत नगरपरिषदेच्या आगामी ...

BJP meeting discusses booth committee, temple opening | भाजपच्या बैठकीत बुथ कमिटी, मंदिर उघडण्याबाबत चर्चा

भाजपच्या बैठकीत बुथ कमिटी, मंदिर उघडण्याबाबत चर्चा

यावेळी सुहास सोळुंके, नागेश नाईक, नारायण ननवरे, जिल्हा मीडिया सेलचे संजय खुरुद आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत नगरपरिषदेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वॉर्डमध्ये बुथ प्रमुख व त्यांच्या कमिट्या नेमण्याबाबत चर्चा झाली. लवकरच यादी करून तालुका अध्यक्ष यांच्याकडे सुपुर्द केली जाईल. त्याप्रमाणे पुढील पक्षाचे काम चालू होईल, असे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सांगितले.

सध्या राज्यात सर्वच व्यवसाय उद्योगधंदे चालू असून, केवळ मंदिर बंद आहेत. यामुळे येथील पुजारीवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिर खुले करण्याबाबत लेखी निवेदन देण्याचे ठरले. बैठकीस विश्वजीत पाटील, सागर पारडे, शांताराम पेदे, पंकज पाटील, राम चोपदार, बाळासाहेब भोसले, प्रसाद पानपुडे, नाना डोंगरे, इंद्रजीत साळुंके, गिरीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: BJP meeting discusses booth committee, temple opening