वाढदिवसाचा जल्लाेष आला अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:55+5:302021-05-31T04:23:55+5:30

उस्मानाबाद -काेविडचा संसर्ग राेखण्यासाठी सध्या जिल्हाभरात जनता कर्फ्यूचा अंमल सुरू आहे. या आदेशाचे उल्लंघन करीत भूम तालुक्यातील रामेश्वर येथील ...

The birthday party was over | वाढदिवसाचा जल्लाेष आला अंगलट

वाढदिवसाचा जल्लाेष आला अंगलट

उस्मानाबाद -काेविडचा संसर्ग राेखण्यासाठी सध्या जिल्हाभरात जनता कर्फ्यूचा अंमल सुरू आहे. या आदेशाचे उल्लंघन करीत भूम तालुक्यातील रामेश्वर येथील वसंतनगर भागात ४० ते ५० लाेक जमवून २८ मे राेजी राहत्या घरासमाेर वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रकरणी संबंधिताविरूद्ध काेविड कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असे असतानाही रामेश्वर येथील लहु अर्जुन नागटीळक (रा. वसंतनगर) यांनी २८ मे राेजी आपल्या राहत्या घरासमाेर वाढदिवसानिमित्त सुमारे चाळीस ते पन्नास लाेक जमवून मनाई आदेश झुगारला. हा प्रकार समाेर आल्यानंतर पाेना. शशिकांत खाेत यांनी सरकार पक्षाच्यावतीने भूम पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून संबंधिताविरूद्ध भादंसंचे कलम १८८, २६९, २७० सह महाराष्ट्र काेविड उपायाेजना नियम ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: The birthday party was over