बायोडिझेलसदृश रसायनाचा टँकर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:37 IST2021-09-23T04:37:30+5:302021-09-23T04:37:30+5:30

तालुक्यातील धाकटेवाडी परिसरात अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार संभाजी थोटे व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गलगत ...

Biodiesel-like chemical tanker seized | बायोडिझेलसदृश रसायनाचा टँकर जप्त

बायोडिझेलसदृश रसायनाचा टँकर जप्त

तालुक्यातील धाकटेवाडी परिसरात अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार संभाजी थोटे व त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या धाकटेवाडी शिवारात उभ्या असलेल्या टँकर (क्र. केए ३३/७९३२) ची तपासणी केली. यावेळी टँकरमध्ये बायोडिझेलसदृश द्रव पदार्थ असल्याचे निदर्शनास आले. यावेळी टँकरसोबत असलेल्या व्यक्तीने पथकाला पाहताच पोबारा केला. महसूल विभागाने पंचनामा करून हे टँकर ताब्यात घेतले. या टँकरमध्ये नऊ ते दहा लिटर बायोडिझेलसदृश रसायन आढळून आले. सदर टँकर पोलीस ठाण्यात उभे करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत महसूल विभागाकडून पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू होते. ही कारवाई नायब तहसीलदार संभाजी थोटे, सपोनी महेश क्षीरसागर, पोउपनी रमाकांत शिंदे, पोहेकाॅ वाल्मिक कोळी, पोना चंद्रकांत गायकवाड, प्रभारी मंडळ अधिकारी डी. एम. चव्हाण, मंडळ अधिकारी प्रवीण कोकणे, तलाठी एस. ए. माचना, तलाठी प्रवीण बनसोडे, एस. व्ही. कुद्रे यांनी केली.

Web Title: Biodiesel-like chemical tanker seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.