लसीकरणासाठी मोठी सुई, वेस्टेजमुळे पळता भुई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:10+5:302021-09-15T04:38:10+5:30
उस्मानाबाद : कोरोना महामारीच्या काळात लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात तुटवडा ...

लसीकरणासाठी मोठी सुई, वेस्टेजमुळे पळता भुई!
उस्मानाबाद : कोरोना महामारीच्या काळात लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक स्तरावर सिरिंज वापरण्याची मुभा आरोग्य विभागास दिली आहे. त्यामुळे आता ०.५ एम.एल मार्किंग असलेले सिरिंज वापरले जात आहे. सध्या वेस्टचे प्रमाण कमी आहे.
जिल्ह्यात कोरोना लसीकरण व बालकांचे लसीकरण नियमित सुरू आहे. लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाला आहे. जिल्ह्यास काही प्रमाणात एडी तर २ सीसी सिरिंज उपलब्ध होत आहेत. लसीकरण सुरळीत सुरू राहावे, यासाठी स्थानिक स्तरावर सिरिंज खरेदीसाठी शासनाने २६ ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. लसीकरणासाठी ०.५ एम.एल मार्किंग असलेले सिरिंज वापरण्यास परवानगी आहे. वेस्टचे प्रमाण कमी आहे.
काय आहे एडी सिरिंज
एडी ही अशी सिरिंज आहे की, जी एकदाच वापरली जाते. ज्यामध्ये ऑटो डिजेबल असते. विशेष म्हणजे ही एडी सिरिंज परत वापरताही येत नाही.
२ सीसी सिरिंज कशी असते
कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून एडी सिरिंज पुरवठा कमी झाल्याने बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सिरिंज वापरण्यात येत आहे. या सिरिंजमध्ये द्रावण घेतल्यानंतर त्यातील एअर काढण्यासाठी काही द्रावण वाया जाते. त्यामुळे लसींचे वेस्टेज वाढण्याची शक्यता आहे. ही सुई काही जाडही असते.
१०००० सिरिंज लागतात रोज जिल्ह्याला
जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसी प्राप्त होत आहेत. सध्या प्रतिदिन १० हजाराच्या जवळपास लस टोचली जात आहे. त्यासाठी १० हजार सिरिंज लागत आहेत.
कोट...
केंद्र सरकारने आता लसीकरणासाठी सिरिंज तुटवडा निर्माण झाल्यास स्थानिक पातळीवर सिरिंज घेण्याची मुभा दिली आहे. त्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. या सुईमधून व्यवस्थित लसीकरण सुरू आहे.
डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण अधिकारी.
वेस्टेज वाढण्याची शक्यता
आपोआप ०.५ एम.एल. लस घेणारी सिरिंज उपलब्ध नसल्याने लस वेस्टेजचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे; परंतु सध्या वेस्टेजचे प्रमाण मायनस आहे. खबरदारी घेऊन नागरिकांना लस दिली जात आहे.