शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘आधार’मुळे भीमरावला आई-वडील भेटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:42 IST

आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

पांडुरंग पोळे नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील आपलं घर येथे अनाथ म्हणून दाखल झालेल्या भीमराव अन् त्याच्या आई-वडिलांची तब्बल चार वर्षानंतर भेट झाली. भीमरावचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील छत्र बोरगाव हे आहे. आधार कार्ड काढण्यासाठी नेल्यानंतर त्याच्या कुटुंबासंदर्भातील माहिती समोर आली. त्यानंतर भीमरावला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.साधारणपणे आठ-नऊ वर्षाचा एक अशक्त मुलगा पोलिसांना आॅक्टोबर २०१६ मध्ये परभणी जिल्ह्यातील मानवत रेल्वे स्टेशनवर आढळून आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यास काहीही आठवत नव्हते. मुलाने दिलेल्या जुजबी माहितीवरून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील असावा, असे समजून त्यास उस्मानाबादच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. परंतु, त्याच्या कुटुंबाची खात्री होईल, त्यामुळे बालकल्याण समितीने त्याला आपलं घरमध्ये दाखल केले. त्यास तिसरीत प्रवेश देण्यात आला. हनुमान घाडगे असे त्याचे नाव नोंदविण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शालेय विभागाने सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे आदेश दिले. तिसरीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड निघाले. परंतु, हनुमानचे आधार कार्ड निघत नव्हते. प्रत्येकवेळी काही ना काही त्रुटी निघत. ही बाब आपलं घरचे प्रभारी व्यवस्थापक नरेश ठाकूरयांनी विश्वस्त पन्नालाल सुराणायांच्या निदर्शनास आणून दिली.त्यावर हनुमान घाडगे यास सोबतघेऊन हे तिघेही गुरूवारी ‘आधार’च्या मुंबई येथील क्षेत्रिय कार्यालयातगेले.आधार कार्यालयाच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतर त्यांनी कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे यापूर्वीच आधार कार्ड काढले असल्याने पुन्हा निघत नसल्याचेस्पष्ट झाले. त्यानुसार हनुमान घाडगेहा अनाथ नसून त्याचे नावभीमराव मच्छिंद्र शिंदे (रा. छत्रबोरगाव, ता. माजलगाव) असल्याचे समोर आले होते.>पेढे वाटून आनंदोत्सव साजराभीमराव शिंदे याचे आधी आधार कार्ड काढण्यात आले होते, असे लक्षात आले. त्यावरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. खात्री पटल्यानंतर भीमरावला बीडच्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. समितीने त्यास आई-वडिलांच्या स्वाधीन केले. चार वर्षानंतर आपला मुलगा भेटल्याने आई-वडील व नातेवाईकांसह मित्रमंडळींनी पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.