सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST2021-09-19T04:33:50+5:302021-09-19T04:33:50+5:30

अशी होऊ शकते फसवणूक एका व्यक्तीने गुगलवर साईट सर्च करुन ऑनलाईन चप्पल मागविला होता. तो न आवड्याने बदलून दुसरा ...

Beware, fraud can happen in the name of festival offers! | सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

अशी होऊ शकते फसवणूक

एका व्यक्तीने गुगलवर साईट सर्च करुन ऑनलाईन चप्पल मागविला होता. तो न आवड्याने बदलून दुसरा चप्पल मागविला. मात्र, ऑर्डर देऊनही वस्तू मिळत नसल्याने गुगलवरुनच कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन कॉल केला. १ रुपये खात्यावर टाकण्यात सांगितले. यावेळी त्यांच्याखात्यातून ३५ हजार रुपये गायप झाले.

एका वेबसाईटवरुन एका व्यक्तीने ऑनलाईन शेगडी ऑनलाईन खरेदी केली होती, पसंत न आल्याने ती परत केली. या व्यक्तीच्या खात्यावरुनही ७ हजार रुपयांची रक्कम गायप झाली. त्यामुळे अपरिचित साईटवरुन अशा वस्तू मागवू नये, ओटीपी शेअर करु नये, असे आवाहन सायबर सेल ने केले आहे.

ही घ्या काळजी

१) ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक .

२) आवडलेली वस्तू ऑर्डर करताना सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडणे.

३) अनोळखी ठिकाणाहून खरेदी करताना केवळ स्वस्त मिळतंय म्हणून एकदम खरेदी करू नये.

४) एखादी वस्तू आवडलेली असेल तर विश्वासार्ह ॲपवरून घेण्याचा प्रयत्न करा.

५) खरेदी करण्यापूर्वी साईटची माहिती बघणे व साईटला रेटिंग किती मिळाले आहेत याची खात्री करणे.

Web Title: Beware, fraud can happen in the name of festival offers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.