शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’ सायकली लागली द्यायला, लाभार्थी राजी नाहीत घ्यायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

उस्मानाबाद - आजही अनेक गावांत बससेवा नाही. खाजगी वाहतूक करणारी वाहनेही विरळच. त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी काही किलाेमीटर पायपीट ...

उस्मानाबाद - आजही अनेक गावांत बससेवा नाही. खाजगी वाहतूक करणारी वाहनेही विरळच. त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी काही किलाेमीटर पायपीट करावी लागते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती दिग्विजय शिंदे यांनी सेस फंडातून सायकल वाटपाचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार ३० लाखांची तरतूद करण्यात आली. सहाशेवर लाभार्थ्यांना सायकली मंजूर केल्या; परंतु आजवर यापैकी ५० टक्केच लाभार्थ्यांनी सायकल खरेदीच्या पावत्या सादर केल्या आहेत. उर्वरित लाभार्थी सायकल घेणार कधी, असा सवाल या निमित्ताने उपस्थित हाेत आहे.

जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, जिथे एसटी महामंडळाची बस जात नाही. काही गावांतील बससेवा खड्डेमय रस्त्यामुळे बंद झाली. अशा गावांतील मुलींना शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागताे. काही मार्गांवर तर खाजगी वाहतूकही अल्प प्रमाणात आहे. परिणामी तीन-तीन किलाेमीटर चालत जाऊन मुलींना शाळा गाठावी लागते. समाजकल्याण समितीचे सभापती दिग्विजय शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत सेस फंडातून लॅपटाॅप, झेराॅक्स मशीन अशा वस्तू वाटपापेक्षा मुलींना सायकल वाटपाचा मुद्दा मांडला. सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर यासाठी सुमारे ३० लाखांची तरतूद करण्यात आली. यानंतर गावपातळीवरून प्रस्ताव मागविण्यात आले. आलेल्या प्रस्तावांची छाननी करून सुमारे सहाशेवर पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सायकल खरेदी करून त्याची पावती समाजकल्याण विभागाकडे सादर केल्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातात. आजवर सहाशेपैकी पन्नास टक्के म्हणजे पावणेतीनशे ते तीनशे लाभार्थ्यांकडूनच प्रशासनाकडे सायकल खरेदीच्या पावत्या जमा झाल्या आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी अद्याप सायकली खरेदी केलेल्या नाहीत. दरम्यान, पात्र ठरलेली एकही विद्यार्थिनी सायकलपासून वंचित राहू नये यासाठी या याेजनेस समितीने मुदतवाढ दिली आहे. एकूणच उपराेक्त चित्र पाहता, ‘जिल्हा परिषद सायकली लागली द्यायला अन् लाभार्थी राजी नाहीत घ्यायला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.