बेलवाडी शाळा ठरली तंबाखूमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:51+5:302021-03-29T04:18:51+5:30
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचनालय, सलाम मुंबई फाऊंडेशन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्य विभाग ...

बेलवाडी शाळा ठरली तंबाखूमुक्त
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचनालय, सलाम मुंबई फाऊंडेशन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्य विभाग तसेच श्री स्वामी समर्थ संस्था लखणगाव (ता.औसा जि. लातूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी डॉ. अ. भा. मोहरे, उपशिक्षणाधिकारी उद्धव सांगळे यांनीही पुढाकार घेतला आहे. या अभियानात लोहारा तालुक्यातील बेलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित केली आहे. सलाम मुंबई फाऊंडेशनने दोन वर्षांकरिता या शाळेस प्रमाणपत्र दिले आहे. आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेले तंबाखूमुक्त शाळेचे नऊ निकष बेलवाडी जिल्हा परिषद शाळेने पूर्ण केले आहेत.