मारहाण करून साेने, राेकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST2021-03-26T04:32:58+5:302021-03-26T04:32:58+5:30

येडशी - उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील घर फाेडून अज्ञाताने साेन्याच्या दागिन्यांसह राेकड लंपास केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. ...

By beating Sae, Raekad lengthened | मारहाण करून साेने, राेकड लांबविली

मारहाण करून साेने, राेकड लांबविली

येडशी - उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील घर फाेडून अज्ञाताने साेन्याच्या दागिन्यांसह राेकड लंपास केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, येडशी येथील लातूर रस्त्यावर सुनील गैबीराज अनपट हे घर आहे. बुधवारी रात्री तीन चोरट्यांनी शेजारच्या घराला बाहेरून कुलूप लावले. यानंतर अनपट यांच्या घराच्या गेटचे कुलूप ताेडून चोरट्यांनी घरात प्रवेश मिळविला. यानंतर सुनील अनपट यांना फळीने मारून जखमी केले. यानंतर एका कपाटातील सात तोळे सोने व खिशातील राेख २७ हजार ५०० रुपये असा एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, तसेच मकरंद गॅस एजन्सीच्या ट्रक (क्र. एमएच.२५-जे.०१७९) मधील ८ हजार रुपयांचे १०० लिटर डिझेल लंपास केले. साेबतच शिवाजी नगर भागातील किराणा व्यापारी शहाजी ताैर यांच्या घराचेही कुलूप ताेडले, मात्र चाेरीचा प्रयत्न फसला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पाेलिसांनी डाॅग स्काॅड पाचरण केले हाेते; परंतु श्वान बसस्थानकाच्या पुढे गेले नाही. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तपास सपाेनि वाय. बी. शिंदे करीत आहेत.

Web Title: By beating Sae, Raekad lengthened