लिहिते व्हा ! नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अॅप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:13 IST2020-01-11T04:13:24+5:302020-01-11T04:13:28+5:30
इंटरनेटच्या विश्वात मराठी भाषेची उपलब्धता नसल्यामुळे तरुणाई जोडली जात नाही अशी ओरड कायम होताना दिसते.

लिहिते व्हा ! नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अॅप’
संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) : इंटरनेटच्या विश्वात मराठी भाषेची उपलब्धता नसल्यामुळे तरुणाई जोडली जात नाही अशी ओरड कायम होताना दिसते. मात्र, त्याकरिता विविध पातळीवर प्रयत्न होताना दिसत आहे. अशाच स्वरूपाचा काहीसा वेगळा उपक्रम ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका अॅपद्वारे आणला आहे. ज्याची माहिती नवोदित लेखकांना दिली जात
होती.
‘# नवी लेखणी’ या उपक्रमात लेखकांना संबंधित अॅपच्या माध्यमातून कथा, कविता आणि कथामालिका लिहिण्याची संधी मिळणार आहे. सदरील ‘हॅशटॅग’ वापरून साहित्य लिहिणाऱ्या प्रत्येकाला संबंधित अॅपकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची मुदत आहे.
याखेरीज, ‘# मी_मराठी’ हा हॅशटॅग वापरून प्रेम कथा, प्रेम कविता आणि निसर्ग कविता यांची स्पर्धाही आयोजित केली आहे. या माध्यमातून येणाºया नवसाहित्यातून १४ फेब्रुवारी रोजी सर्वोत्कृष्ट साहित्यकृती निवडण्यात येणार आहे.
अॅप संदर्भात गणेश शिंदे यांनी सांगितले की, इंग्रजी भाषा इंटरनेटवर सहज उपलब्ध होते. सदरील अॅपवर १९ हजार ११२ लेखकांचे दीड लाख प्रकाशित साहित्य ५० लाखांहून अधिक वाचक वाचत आहेत.