ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:30+5:302021-09-16T04:40:30+5:30

समीर सुतके उमरगा : आजकाल ‘अरेंज मॅरेज’चे प्रमाण कमी होत असून, समाजमाध्यमांद्वारे ऑनलाईन लग्न जुळविण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. ...

Be careful when looking for a mate online, empty your pockets before your hands turn yellow! | ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा !

ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा !

समीर सुतके

उमरगा : आजकाल ‘अरेंज मॅरेज’चे प्रमाण कमी होत असून, समाजमाध्यमांद्वारे ऑनलाईन लग्न जुळविण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. परंतु, प्रेमप्रकरणातून सुरू केलेला संसार किंवा ऑनलाइनमधून झालेल्या मित्रतेला लग्नगाठीत रूपांतरित केले तरी तो सुखी संसार होण्यात बहुधा अपयशी ठरतो. ऑनलाइनमुळे जोडीदार शोधताना मुलगा किंवा मुलगी ही पैसा, पद, प्रतिष्ठा पाहून जुळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पैसा पाहून जवळ येणारी व्यक्ती आपल्याशी प्रामाणिक राहतोच असे नाही. अनेकदा हात पिवळे होण्याअधीच फसवणुकीचे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्वीटरच्या माध्यमातून मैत्री करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणे हे नुकसानदायी व आयुष्यभरासाठी पिडादायक ठरणारे होऊ शकते. त्यामुळे यापासून सावध राहणे खूप गरजेचे आहे.

ऑनलाइनवर जोडीदार शोधताना त्या व्यक्तीला आपण ओळखतो किवा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे.

ज्या व्यक्तीशी मैत्री करतो ती व्यक्ती आपल्या संसारात आपल्याला साथ देईल किंवा नाही याची खात्री करावी.

मित्रता करताना आपला व्यवसाय, नोकरी किंवा आपल्याला किती मिळकत आहे याची शहानिशा करणारा जोडीदार आपल्याशी प्रामाणिक राहीलच याची खात्री नाही.

मैत्री केल्यावर पैशाचा हव्यास असलेली व्यक्ती आपल्यावर प्रेम करणार नाही तर ती आपल्या पैशावर प्रेम करते, त्यांचा स्वार्थ सिद्ध झाल्यास आपल्याला दूर करतील.

अशी होऊ शकते फसवणूक

आपल्याशी ऑनलाइन जवळीक साधून मित्रता करतील. हळूहळू लग्नाच्या गोष्टी सुरू होतील. समोरच्या व्यक्तीच्या काय आवडी-निवडी जाणून घेत त्यानुसार आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होईल. त्यानुसार श्रीमंत तरुणांच्या नादी लागून त्यांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा यशस्वी प्रयल होतो.

आपल्या मिळकतीवरून आपल्याशी कुणी लग्न करण्याच्या गोष्टी करीत असेल तर सावध व्हा. ती व्यक्ती आपल्याला पाहून नाही तर आपला पैसा पाहून जवळ येत आहे. तो आपली कधीही फसवणूक करेल. यासाठी आपण सतर्क राहा. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या.

उमरगा पोलीस ठाण्यात आतापर्यंत तरी अशी तक्रार आली नाही. तरीपण ऑनलाईन जोडीदार शोधताना काळजी घ्यावी. कुणी व्यक्ती आपली फसवणूक तर करीत नाही ना, याची शहानिशा करावी. पैशापायी आपल्यासोबत कुणी व्यक्ती जवळीक साधत आपल्यासोबत विवाहबंधन बांधण्याच्या गोष्टी करीत असेल तर त्याची स्वत: काळजी घ्यावी, अन्यथा तो आपली फसवणूक करू शकतो.

- सिद्धेश्वर गोरे, सपोनि, उमरगा

Web Title: Be careful when looking for a mate online, empty your pockets before your hands turn yellow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.