वडगावच्या सरपंचपदी शिवसेनेचे बळीराम कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:33 IST2021-02-10T04:33:01+5:302021-02-10T04:33:01+5:30
उपसरपंचपदी देवकन्या मोरे यांची बिनविरोध निवड उस्मानाबाद - तालुक्यातील सर्वाधिक लक्ष लागुन असलेली बहूचर्चित वडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचे ...

वडगावच्या सरपंचपदी शिवसेनेचे बळीराम कांबळे
उपसरपंचपदी देवकन्या मोरे यांची बिनविरोध निवड
उस्मानाबाद - तालुक्यातील सर्वाधिक लक्ष लागुन असलेली बहूचर्चित वडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचे बळीराम कांबळे तर उपसरपंचपदी देवकन्या मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर अंकुश मोरे समर्थक तसेच पंचायत समिती गजेंद्र जाधव समर्थकानी गुलालाची व फटाक्याची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
११ सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत पॅनल प्रमुख अंकुश मोरे यांच्या शिवसेना पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलने ८ जागेवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. यानंतर मंगळवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवड बिनविरोध पार पाडत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकावला.
निवडुन आलेल्या उमेदवारामध्ये बळीराम कांबळे, सुरेश मुळे,लक्ष्मीकांत हजारे,देवकन्या मोरे,लक्ष्मी जाधव,सविता वाडकर,केवळ पांढरे,महानंदा म्हेत्रे यांचा समावेश आहे. निवडीनंतर नूतन सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच देवकन्या मोरे व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करुन गावामाध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वडगावचे युवानेते अंकुश मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव,सुरेश जानराव,सोमनाथ कांबळे,जयराम मोरे,सिद्धेश्वर मोरे,बाळासाहेब म्हेत्रे,महादेव म्हेत्रे,तुकाराम वाडकर,बबन पाटील,राजेंद्र जाधव,बालाजी मंगरूळे,सुनील पांढरे,रंजीत मोरे,आण्णा मोरे,पोपट मोरे,बाळासाहेब मोरे,सुरज वाडकर,काका कांबळे,राहुल म्हेत्रे,ओमकार माळी आदी उपस्थित होते.