फोर्ब्सने घोषित केलेल्या यादीत बालाजी अमाइन्सला स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:39 IST2021-09-24T04:39:04+5:302021-09-24T04:39:04+5:30

फोर्ब्सने आशिया खंडातील उत्कृष्ट कारखान्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातील २६ नामांकित कंपन्यांचा समावेश झाला आहे. यात ...

Balaji Amines in the list announced by Forbes | फोर्ब्सने घोषित केलेल्या यादीत बालाजी अमाइन्सला स्थान

फोर्ब्सने घोषित केलेल्या यादीत बालाजी अमाइन्सला स्थान

फोर्ब्सने आशिया खंडातील उत्कृष्ट कारखान्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातील २६ नामांकित कंपन्यांचा समावेश झाला आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाजी अमाईन्सचाही समावेश आहे. कंपनीची उलाढाल १.४४८ मिलीयन डॉलर असून यादीत बहुतांश फार्मा कंपन्या आहेत. त्याचे प्रमुख कारण कोविड-१९ असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. कोरोनाच्या विरोधात लढताना जगभरात औषधाची प्रंचड मागणी वाढली आहे. औषधी कंपन्या व त्यांचा पुरवठादार असलेले घटक तेजीत आहेत. भांडवली बाजारात त्यांचे समभाग सर्वाधिक विकले गेले. गुंतवणूकदारांना त्याचा परतावा मिळाला. १७ सप्टेंबरपर्यंत सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपन्यांमधे बालाजी अमाइन्सचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक विश्लेषण करणाऱ्या एजन्सीने देखील बालाजी अमाइन्सची दखल घेतली असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले.

चौकट

ग्रामीण भागासाठी दिली मदत

बालाजी अमाइन्स कारखान्याने कामगारांबरोबर ग्रामीण भागाचे हित जपले आहे. कोरोनाच्या महामारीत कोट्यवधी रुपयांच्या अत्यावश्यक मशिनरी, सॅनिटायझर फवारणीसाठी रसायनाचा पुरवठा सरकारी रुग्णालय, जिल्हा परिषद, नगरपालिकाना केला. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली. साेबतच उस्मानाबाद, सोलापूर जिल्हयांत मागणीप्रमाणे ग्रामीण शहरी भागात शाळा, ग्रामपंचायतींना आवश्यक साहित्य पुरवठा केला, असे बालाजी अमाइन्सकडून सांगण्यात आले.

Web Title: Balaji Amines in the list announced by Forbes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.