पोषण आहाराबाबत पाककलेद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:38 IST2021-09-24T04:38:46+5:302021-09-24T04:38:46+5:30
लोहटाच्या सरपंच नंदिनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सदस्य जयश्री सांजेकर, सुभाष घोडके, आरोग्यसेविका वंदना सावंत, माडजे यावेळी उपस्थित ...

पोषण आहाराबाबत पाककलेद्वारे जनजागृती
लोहटाच्या सरपंच नंदिनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सदस्य जयश्री सांजेकर, सुभाष घोडके, आरोग्यसेविका वंदना सावंत, माडजे यावेळी उपस्थित हाेत्या. पर्यवेक्षिका ताई बोराडे यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालिका रेखा झांबरे यांनी स्तनदा माता, गरोदर मातांना सकस आहाराचे महत्त्व सांगितले. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्त्या आशा खैरे, आडसूळ यांनी पोषण आहार, कुटुंब नियोजन, मुलगा-मुलगी समानतेवर गीते व पोवाडा सादर केला. यानंतर पाककलेत बनवलेल्या पदार्थांचे गरोदर मातांना व उपस्थितांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला डिकसळ कार्यकर्ती पंचशिला मस्के, पिंपळगाव (डोळा) कार्यकर्ती पल्लवी घोडके, छाया शिंदे यांच्यासह लोहटा (पूर्व) विभागातील सर्व कार्यकर्त्या, मदतनीस उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी कार्यकर्ती ललिता थोरात यांनी केले, तर आशा जाधव यांनी आभार मानले.