संगीता पाचंगे यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:08+5:302021-01-13T05:25:08+5:30

उस्मानाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ भटके विमुक्त ...

Awarded to Sangeeta Pachange | संगीता पाचंगे यांना पुरस्कार प्रदान

संगीता पाचंगे यांना पुरस्कार प्रदान

उस्मानाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य आश्रमशाळेतील सामाजिक कार्यकर्ती संगीता पाचंगे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा जनकल्याण समितीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक रमेश जोशी, जिल्हाध्यक्ष डॉ. आदिनाथ राजगुरू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कल्याण समितीचे तुषार जुवेकर, राष्ट्रसेविका समितीच्या सेविका उज्ज्वला मसलेकर आदींची उपस्थिती होती. पुरस्काराची रक्कम पाचंगे यांनी यमगरवाडी येथील भटके-विमुक्तांसाठी चालविल्या जाणाऱ्या एकलव्य आश्रमशाळेच्या प्रकल्पाकडे सुपूर्द केली. सूत्रसंचालन शंकर पांढरे यांनी तर आभार ॲड. श्रीकृष्ण मसलेकर यांनी मानले.

(कॅप्शन)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत ) यांच्या वतीने देण्यात येणारा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार राज्याचे उपाध्यक्ष रमेश जोशी यांच्या हस्ते संगीता पाचंगे यांना देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. आदिनाथ राजगुरू, तुषार जिवेकर, उज्ज्वला मसलेकर आदी.

Web Title: Awarded to Sangeeta Pachange