महावितरणच्या कार्यालयास ठाेकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:15 IST2021-02-05T08:15:14+5:302021-02-05T08:15:14+5:30
लोहारा (जि. उस्मानाबाद) : दोन महिन्यांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ...

महावितरणच्या कार्यालयास ठाेकले टाळे
लोहारा (जि. उस्मानाबाद) : दोन महिन्यांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या हिप्परगा (रवा) येथील शेतकर्यांनी वीज कंपनीच्या उपविभागीय कार्यालयास बुधवारी टाळे ठाेकले.
लोहारा उपविभागीय वीज वितरण कंपनीने कृषिपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र फिडरची व्यवस्था करून ६८ रोहित्र बसवले आहेत. परंतु, या फिडरवरूनच इतर तीन गावांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे फिडरवर अतिरिक्त भार पडत असल्याने रोहित्र सतत नादुरुस्त होणे, तांत्रिक बिघाड येणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा होत नाही. परिणामी शेतकरी त्रस्त झाले आहेत. बोअर, विहिरी, साठवण तलाव तसेच पाझर तलावांत मुबलक पाणी आहे. असतानाही पिकांना देणे कठीण झाले आहे. परिणामी हरभरा, ज्वारी, गहू आदी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या हिप्परगा (रवा) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाला टाळे ठाेकले. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काहीकाळ तणाव निर्माण झाल्याने पाेलिसांना पाचारण करण्यात आले. सुरळीत वीजपुरवठ्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. हे आंदाेलन तीन तास चालले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित लोमटे, माजी सरपंच विजय लोमटे, संजय नरगाळे, धर्मवीर जाधव, नारायण क्षीरसागर, जीवन होनाळकर, विनोद मोरे, मनोज गवळी, तानाजी नरगाळे, ज्ञानेश्वर मोरे, संजय नरगाळे, अनिल आतनुरे, उमेश गिराम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.