शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

उस्मानाबादेत सरासरीच्या ५२ टक्केच पाऊस;शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:41 IST

पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५२.८८ टक्के एवढा पाऊस झाला आहे.

उस्मानाबाद : सलग दोन वर्ष जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. सुरूवातीच्या काळात हवामान खात्याने केलेल्या भाकितानुसार यंदाही दमदार पर्जन्यमान होईल, अशी आशा होती. परंतु, पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५२.८८ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन-चार वर्ष भीषण दुष्काळाचा सामना केल्यानंतर मागील दोन वर्ष जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे लहान-मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदाही दमदार पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना अशा होती. हवामान खात्यानेही पावसाळच्या प्रारंभीच दमदार पावसाचे भाकित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आणखीच पल्लवित झाल्या होत्या. परंतु, जिल्ह्यात आजवर झालेला पाऊस पाहता, हवामान खात्याचे भाकित भरकटल्याचे दिसून येते. मागील साडेतीन महिन्यात जिल्ह्यात जेमतेम ५२.८८ टक्के एवढा अल्प पाऊस झाला आहे. 

खरीप पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना जिल्ह्याच्या काही भागात २७, काही भागात २५ दिवस आणि काही भागात २० पेक्षा अधिक दिवस पावसाने उघडीप (खंड)  दिली. त्यामुळे खरिपातील उडीद, मूग यासारखी नगदी पिके वाया गेली. एकरी एक ते दीड क्विंटलही उत्पादन मिळाले नाही. सायोबीनची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. सोयाबीनला शेंगा कमी लागल्या असून दाणेही पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे एकरी उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. 

दरम्यान, पावसाच्या खंडरूपी अडथळ्यांची शर्यत पार करीत खरीप हंगाम पार पडला असला तरी शेतकऱ्यांना आता रबी पेरणी होणार की नाही, याची चिंता लागली आहे. कारण अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

तीन तालुके पन्नाशीच्या आतच...जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पर्जन्यमानावर नजर टाकली असता, चिंताजनक चित्र समोर येथे. तीन तालुक्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाकही कमी पाऊस आहे. यामध्ये उस्मानाबाद ४२.८५ टक्के, भूम ४२.३७ आणि परंड्यात सर्वात कमी ३८.४७ टक्के पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे तुळजापूर ५५.३१, उमरगा ७७.४७, लोहारा ५१.०६, कळंब ५६.६८ आणि वाशी तालुक्यात ५८.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

प्रकल्पांच्या घशाला कोरड कायम !जिल्हाभरात लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्पांची संख्या साधारणे पावणेतीनशेच्या घरात आहे. मागील दोन वर्षांत बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु, यंदाच्या पावसाळ्यातील तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही पन्नास टक्क्यांच्या आसपास पाऊस झाल्याने जवळपास सर्वंच प्रकल्पांच्या घशाची कोरड कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद