संशयाने केला घात; कुऱ्हाडीने वार करीत पत्नीसह सासूचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 19:44 IST2020-08-29T19:42:39+5:302020-08-29T19:44:47+5:30

पत्नीस तिच्या आईची फूस होती, असा संशय आरोपीच्या डोक्यात होता.

Assault done with suspicion; Murder of mother-in-law with wife by attacking with ax | संशयाने केला घात; कुऱ्हाडीने वार करीत पत्नीसह सासूचा खून 

संशयाने केला घात; कुऱ्हाडीने वार करीत पत्नीसह सासूचा खून 

ठळक मुद्देआरोपी पत्नी सारिका यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे गेल्या काही महिन्यापासून विवाहिता आईकडे पुणे येथे राहायची

परंडा (जि़ उस्मानाबाद) : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सारिका हरिश्चंद्र जाधव (३५) व सासू लक्ष्मी दादा क्षीरसागर ( ५५) यांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची घटना तालुक्यातील सरणवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र जाधव याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

सरणवाडी येथील बांधकामाच्या सेंट्रींगचे काम करणाऱ्या हरिश्चंद्र जाधव (३९) याचा त्याची पत्नी सारिका यांच्या चारित्र्यावर संशय होता. तसेच पत्नीस तिच्या आईची फूस होती, असा संशय त्याच्या डोक्यात होता. गेल्या काही महिन्यापासून आईकडे पुणे येथेच राहत असलेली त्याची पत्नी सारिका ही शुक्रवारीच आईसह सरणवाडी येथे हरिश्चंद्र याच्याकडे आल्या होत्या. यावेळी त्यांच्यात वाद झाला.

रागाच्या भरात हरिश्चंद्र याने पत्नी सारिका जाधव व सासू लक्ष्मी क्षीरसागर (रा. माणकेश्वर, ता. भूम) या मायलेकीचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. सरणवाडी येथील घरासमोरील भर रस्त्यावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परंड्याचे पोलीस निरीक्षक एकबाल सय्यद पोलीस फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी हरिश्चंद्र जाधव यास ताब्यात घेण्यात आले आहे. 
 

Web Title: Assault done with suspicion; Murder of mother-in-law with wife by attacking with ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.