येडशीत कबड्डी स्पर्धेत आष्टीचा संघ अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST2021-09-05T04:37:03+5:302021-09-05T04:37:03+5:30
रामलिंग देवस्थानच्या यात्रेनिमित्त खुल्या कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आल्या हाेत्या. या स्पर्धेत जवळपास ३० संघ सहभागी झाले होते. अंतिम ...

येडशीत कबड्डी स्पर्धेत आष्टीचा संघ अव्वल
रामलिंग देवस्थानच्या यात्रेनिमित्त खुल्या कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आल्या हाेत्या. या स्पर्धेत जवळपास ३० संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना परंडा विरूद्ध आष्टी असा झाला. या अटीतटीच्या लढतीत आष्टीच्या धसदादा स्पोर्टस अकॅडमी या संघाने विजय मिळवित पहिले पारिताेषिक पटकाविले. द्वितीय क्रमांक महाराष्ट्र कबड्डी संघ परांडा, तृतीय क्रमांक सेवाभाया कबड्डी संघ लातूर व चतुर्थ क्रमांक नवयुग कबड्डी संघ लातूर यांनी पटकाविला अंतिम स्पर्धेत विजयी खेळाडूंना उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे सूत्र संचालन संतोष मुळे यांनी केले. यावेळी युवासेना जिल्हा अध्यक्ष अक्षय ढाेबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, सरपंच गोपाळ नागटिळक, तुळशीदास जमाले, युवासेना सचिव सुनील शेळके विभाग प्रमुख विनोद पवार, नितीन भोसले, अमर पवार, अशोक पवार, विलास काळे, आबा शेळके उपस्थित होते.
040921\img-20210904-wa0233.jpg
कबड्डी स्पर्धा