आरोग्यवर्धिनी उपकेंद्रेच ग्रामीण आरोग्याचा आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:17+5:302021-03-04T05:00:17+5:30

फाेटो - डीएचओ उस्मानाबाद 02) उस्मानाबाद : उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा आहे. त्यात मानवी निर्देशांक उंचाविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न ...

Arogyavardhini sub-center is the mainstay of rural health | आरोग्यवर्धिनी उपकेंद्रेच ग्रामीण आरोग्याचा आधारस्तंभ

आरोग्यवर्धिनी उपकेंद्रेच ग्रामीण आरोग्याचा आधारस्तंभ

फाेटो - डीएचओ उस्मानाबाद 02)

उस्मानाबाद : उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा आहे. त्यात मानवी निर्देशांक उंचाविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न चालू आहेत. त्यात खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात असलेली आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे हीच ग्रामीण आरोग्याचा आधारस्तंभ असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.

आळणी येथील उपकेंद्राच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. सध्या ग्रामीण भागात रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर यासारखे रोग झपाट्याने वाढत आहेत. त्यात लोकांना घराच्या नजीक या सेवा आरोग्यवर्धिनीच्या माध्यमाद्वारे उपलब्ध होत असून, विविध सेवेशी संबंधित १३ आरोग्यविषयक बाबी राबविल्या जात आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपकेंद्रातील साहित्य, औषधी, परिसराची त्यांनी पाहणी केली तसेच स्वत: रक्तदाबाची तपासणी करून प्रत्यक्ष सर्व सामग्री चालू आहे का याची खात्री करून घेतली.

कोरोनाकाळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुन्हा दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर आरोग्य उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती बिरादार, आरोग्यसेविका टेकाडे, सेवक कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एच. व्ही. वडगावे, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चंद्रकांत ऐवाळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

फोटो : उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी तालुक्यातील आळणी येथील उपकेंद्रास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Arogyavardhini sub-center is the mainstay of rural health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.