विकासकामांसाठी निधी मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:41+5:302021-09-27T04:35:41+5:30
वाशी : शहरातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी निवेदनाद्वारे विविध विभागांच्या मंत्र्यांकडे ...

विकासकामांसाठी निधी मंजूर करा
वाशी : शहरातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी निवेदनाद्वारे विविध विभागांच्या मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती शहराध्यक्ष विकास पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील इतर नगर परिषदांकडून झालेल्या विकासकामाच्या तुलनेत वाशी शहराचा विकास करण्यास नगरपंचायतला अपयश आले असल्याचा आरोप करत ती उणीव भरून काढण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी माजी आ. मोटे यांनी केल्याचे पवार यांनी म्हटले आहे. यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोड यांच्याकडे वाशी बसस्थानक रस्ता, शहराला नवीन पाणीपुरवठा योजना आदी कामांना मंजुरी व निधी देण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालय व ट्राॅमा केअर सेंटरसाठी निधीची मागणी करण्यात आली असून, नगरविकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शहरासाठी आवश्यक असलेले २२० केव्हीए उपकेंद्र व इतर विविध विकासकामांना मंजुरी देण्यासाठी साकडे घालण्यात आल्याचे पवार म्हणाले. या वेळी शहराध्यक्ष ॲड. सूर्यकांत सांडसे व पदाधिकारी उपस्थित होते.