सुकाळे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:52+5:302020-12-29T04:30:52+5:30
येलकट्टे यांचा सत्कार उस्मानाबाद : येथील काठीयावाडी मेहतर (रूखी) समाज विकास मंडळाच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलकुट्टे यांचा ...

सुकाळे यांची नियुक्ती
येलकट्टे यांचा सत्कार
उस्मानाबाद : येथील काठीयावाडी मेहतर (रूखी) समाज विकास मंडळाच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलकुट्टे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत परमार, जिल्हा कार्याध्यक्ष विकी वाळा, सचिव महेश कबीर, संजय वाया यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निधन.....
दिगंबर काशीद
परंडा : येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष दिगंबर महादेव काशीद (वय ९५) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. बावची रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महावीर काशीद यांचे वडील तर तालुक्यातील भोंजा येथील ग्रामसेवक मनोज काशीद यांचे ते आजोबा होत.