प्राचार्यपदी कठारे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST2021-02-05T08:17:22+5:302021-02-05T08:17:22+5:30
वाशी : येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. रवींद्र कठारे यांची नियुक्ती झाली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या ...

प्राचार्यपदी कठारे यांची नियुक्ती
वाशी : येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. रवींद्र कठारे यांची नियुक्ती झाली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा मोळवणे यांचा प्राचार्य पदाचा कार्यकाल संपला असून, त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. यामुळे त्यांच्या रिक्त जागी आता शिवाजी शिक्षण प्रसारक मंडाळाने तात्पुरते प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. रवींद्र कठारे यांची नियुक्ती केली आहे.
नूतन सदस्यांचा गुंजोटीत सत्कार
गुंजोटी : येथे विश्व मराठा संघाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखेचे अध्यक्ष आकाश शिंदे, सूरज माने, राजू शिंदे, ऋषिकेश शिंदे, सुदर्शन गायकवाड, स्वप्नील माने, ज्योतीराम माने, लखन बाबरे, मनोज पांचाळ, निखील शाईवाले, महेश चव्हाण, अभिषेक किरकोळ, संजय कदेरे, परमेश्वर हत्तीकाळे, भीम औरादे, विशाल शिंदे, ऋषिकेश चव्हाण, स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते.
गृहपाल सरतापे यांचा सत्कार
उस्मानाबाद : येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल विशाल सरतापे यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारी (सोलापूर) म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल येथे तहसीलदार गणेश माळी तसेच क्रीडा संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार राजाराम केलूरकर, तालुका क्रीडाधिकारी सारीका काळे, गुरुनाथ माळी, योगेश थोरबोले, माऊली भुतेकर, कुलदीप सावंत, जिल्हा कोषागार कार्यालयाचे लेखा लिपीक सरनाीक, ग्रामसेवक माळी आदी उपस्थित होते.
कर्मवीर सप्ताह सोहळ्यास प्रारंभ
तेर : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त येथील महाराष्ट्र संत विद्यालयात कर्मवीर सप्ताह सोहळ्यास सोमवारी प्रारंभ झाला. यावेळी मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव, नामदेव कांबये यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. याप्रसंगी एम. हन. भंडारे, जे. बी. बोराडे, डी. डी. राऊत, आर. एम. देवकते, एम. एन. शितोळे, ए. एन. रणदिवे, ए. डी. राठोड, के. एस. सय्यद, एम. आय. बागवान आदी उपस्थित होते.
मंजुरी मिळूनही काम सुरू होईना
उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी, उमरेगव्हाण व पाटोदा या रस्ता कामास मंजुरी मिळूनही ते सुरू होत नसल्याची तक्रार युवक काँग्रेसचे महेश पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, यामुळे वाहनधाक त्रस्त आहेत. या मार्गावर सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे काम त्वरित सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
शिवजयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धा सुरू
उमरगा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील नारंगवाडी येथे आयोजित खुल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ॲड. शीतल चव्हाण यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने या स्पर्धा होत आहेत. याप्रसंगी प्रमोद बाकलीकर, पोलीसपाटील हेमंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सुनील चिकुंद्रे, जयकुमार जोशी, अमोल चव्हाण, दादा चिकुंद्रे आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण
परंडा : येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिझम व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. अर्थसंकल्प सुरू होण्यापूर्वी राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विशाल जाधव आणि ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिझम विभागाचे प्रा. सज्जन यादव यांनी विद्यार्थ्यांना केंद्रीय अर्थसंकल्प समजावून सांगितला. प्रास्ताविक प्रा. सज्जन यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. प्रा. डॉ. विशाल जाधव यांनी आभार मानले.
अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
तुळजापूर : अणदूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुका वीर माहेश्वर जंगम समाज संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रवीण स्वामी, उपाध्यक्ष प्रशांत स्वामी, गुरूलिंगय्या स्वामी, वीरभद्र स्वामी, अमर स्वामी, अशोक स्वामी, सूरज स्वामी, शैलेश स्वामी, निजगुण स्वामी, नागेश स्वामी, संगमेश्वर स्वामी, रजनीकांत स्वामी आदींच्या सह्या आहेत.
रामकथा सोहळा
तेर : येथील बुधवारपासून अखंड हरिनाम सप्ताह, श्री तुकाराम गाथा पारायण व संगीतमय रामकथा शक्ती ज्ञान यज्ञास प्रारंभ होत आहे. यात दीपक महाराज खरात रामकथा सांगणार असून, गाथा वाचन व्यासपीठ बाबुराव कुरूंद व गणेश कुरूंद महाराज भूषविणार आहेत.
निवडीकडे लक्ष
पाथरूड : पाथरूडसह परिसरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, आता प्रशासनाने सरपंच आरक्षण काढून निवडीचा कार्यक्रमदेखील जाहीर केला आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते, याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.
फलक गायब
भूम : तालुक्यात अनेक मार्गांवर बसविण्यात आलेले दिशादर्शक फलक सध्या गायब आहेत. विशेषत: अहमदनगर - उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील प्रवेशद्वार असलेले नामफलकदेखील बेपत्ता असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.