कोविड उपाययोजनांसाठी नोडल अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST2021-04-01T04:33:00+5:302021-04-01T04:33:00+5:30
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढलेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याकडे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी व ...

कोविड उपाययोजनांसाठी नोडल अधिकारी नियुक्त
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढलेल्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याकडे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी व कायदा -सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. विजयकुमार फड हे डेटा व्यवस्थापन पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहतील. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा सांख्यिकी अधिकारी वामन जाधव, अतिरिक्त जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे हे वेळच्या वेळी चाचण्या, लसीकरण व अन्य आवश्यक माहिती अद्ययावत करतील. अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले या जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचे पर्यवेक्षण व समन्वय करतील. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व सर्व उपविभागीय अधिकारी शहर व ग्रामीण भागामधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोन्स, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे त्याची अंमलबजावणी करतील. जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे यांना लसीकरणाची गती वाढविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी दिली आहे. जिल्हा लसीकरण अधिकारी के. के. मिटकरी हे लसीकरण केंद्र व नमुना संकलन केंद्र वेगवेगळे ठेवण्याची उपाययोजना करतील. उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्याकडे ऑक्सिजन पुरवठा, उपलब्धता, गरज याबाबतचे नियंत्रण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय पाटील यांच्याकडे व्हेंटिलेटरची उपलब्धता, आवश्यकता, दुरुस्ती याबाबतची कार्यवाही करणे, मृत्यूंचे डेथ ऑडिट तातडीने पूर्ण करून घेणे ही जबाबदारी असणार आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी सचिन बोडके व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक भुतेकर यांनी खाटा वाढविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.