उपसभापतीपदी अनिता चौबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:48+5:302021-03-20T04:31:48+5:30
परंडा : येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिरसाव गणाच्या सदस्या अनिता पोपट चौबे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती शीतल वाघमारे ...

उपसभापतीपदी अनिता चौबे
परंडा : येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिरसाव गणाच्या सदस्या अनिता पोपट चौबे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती शीतल वाघमारे यांनी जवळा (नि) येथून ग्रामपंचायत निवडणूक लढवून त्या सरपंच झाल्याने त्यांनी उपसभापतीपदाचा व पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी अनिल हेजळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत उपसभापती पदासाठी पं. स. सभापती अनुजा दैन यांनी अनिता चौबे यांचे नाव सूचक असलेला एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. बैठकीस नऊपैकी अश्वनी देवकर, प्रणिता मोरे, सुषमा शिंदे, अनुजा दैन, अनिता चौबे व अमोल करळे हे सहा सदस्य उपस्थित होते. तर गुलाब शिंदे व सुधाकर कोकाटे हे अनुपस्थित राहिले.